न्यूज पीसीएमसी नेटवर्क
देहू वार्ताहर (दि. १८ जानेवारी २०२४) :- अयोध्येत श्रीराम मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे. या दिवशी पुणे जिल्ह्यातील सर्व दारू दुकाने व मांस विक्रीची दुकाने बंद ठेऊन हा दिवस राष्ट्रीय सणाप्रमाणे साजरा व्हावा, अशी मागणी श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज भंडारा डोंगर ट्रस्ट व वारकरी संप्रदायातील भाविकांच्या वतीने पुणे जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांना लेखी पत्राद्वारे केली आहे.
भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद यांनी पत्रात म्हटले आहे की, अयोध्या मंदिरात रामलल्लांच्या प्रतिष्ठापनेने संपूर्ण भारत देशवासीयांचे स्वप्न साकार होत आहे.
त्या अनुषंगाने २२ जानेवारी रोजी दिवाळीप्रमाणे मंगल व पवित्र वातावरणात आनंदोत्सव देशभर साजरा होत आहे. या दिनी दारू व मांस विक्री दुकानदारांना आदेश देऊन २२ जानेवारी रोजी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश द्यावेत, असे म्हटले आहे.











