न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ एप्रिल) :- पिंपरी चिंचवड शहरातील रहाटणी येथील कोकणे चौकाजवळील पुणेकर ज्वेलर्सवर काही दिवसांपूर्वी ५ जणांनी सशस्र दरोडा घातला होता. दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात दुकानाचे मालक दिव्यांक प्रदीप मेहता (वय २५, रा. आर्य वेदांत रेसिडेन्सी, रहाटणी, पुणे) गंभीर जखमी झाले होते.
या दरोड्यात काही किलो वजनाचे सोन्याचे दागिणे चोरीस गेले होते. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना गजाआड केले आहे. त्यांच्याकडून सुमारे तेवीस लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आणि दोन गावठी पिस्तूल हस्तगत केली आहेत.
सुभाष मोहनलाल बिशनोई ( वय २४, रा. मंगाली मोहबत, ता. हरियाणा) आणि महिपाल दुधाराम जाट (वय २१, रा. बालेवाडी, पुणे) अशी अटक केल्याची नावे असून पोलीस इतर आरोपींचा अद्याप शोध घेत आहेत.











