न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १८ एप्रिल) :- मावळ लोकसभा मतदारसंघात एकूण २ हजार ५०४ मतदान केंद्रे आहेत. त्यापैकी २०८ मतदान केंद्रांची वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून या केंद्रांवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. तसेच कॅमे-याद्वारे चित्रीकरण केले जाणार आहे.
पनवेलमध्ये सर्वाधिक ५८ मतदान केंद्रांचा समावेश आहे. तर सर्वात कमी १ मतदान केंद्र चिंचवड मधील आहे. या कॅमे-यांच्या माध्यमातून करण्यात येणारे चित्रीकरण जिल्हा निवडणूक अधिका-यांच्या कार्यालयात दिसणार आहे. कर्जत ३५, उरण २९, चिंचवड १, पिंपरी ४० व इतर मिळून एकूण २०८ मतदान केंद्राचे कॅमेराद्वारे चित्रीकरण केले जाणार आहे.











