- मनोज जरांगे पाटलांचा ताफा मध्यरात्रीच्या सुमारास शहरात दाखल अनं पहाटेच्या सुमारास रवाना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 25 जानेवारी 2024) :- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा पिंपरी चिंचवड शहरात बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास दाखल झाली. जेसिबितून त्यांच्यावर समर्थकांनी फुलांची उधळण केली.
रक्षक चौकात रात्री ११.१५ वाजता मनोज जरांगे पाटील मोठ्या ताफ्यासह आले होते. लाखो आंदोलक त्यांच्या सोबत होते. त्यानंतर पुढे काळेवाडी फाटा, डांगे चौक मार्गे चिंचवड आणी शेवटी निगडी भक्तीशक्ती मार्गे मावळात पहाटेच्या सुमारास त्यांचा ताफा रवाना झाला.
हजारोंच्या संख्येने त्यांच्या सोबत गाड्या देखील होत्या. त्यांना समर्थन देण्यासाठी लाखोंची गर्दी उसळली होती. तब्बल बारा तासांच्या प्रतिक्षेनंतरही समर्थकांमध्ये तोच उत्साह पाहायला मिळत होता
पिंपरी चिंचवड शहर जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यास सकाळी ९ वाजल्यापासून सज्ज होते. अखेर रात्री ११.१५ वाजता जरांगे पाटील पिंपरी चिंचवडमध्ये दाखल झाले.
एक मराठा लाख मराठा.. मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे.. आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे.. अश्या जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या होत्या..
यावेळी दानशूर मंडळींनी मराठा बांधवांसाठी जेवण, केळी, नाष्टा, बिस्किट, पाण्याचे वाटप करीत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.











