न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जानेवारी २०२४) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अस्थायी अस्थापनेवर शिकाऊ उमेदवार (Apprenticeship) म्हणून १ वर्ष कालावधी करीता प्रतिक्षा यादीतील निवड केलेल्या शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणार्थी (apprentice) यांचा नेमणूक आदेश जारी करण्यात आला आहे.
महानगरपालिकेच्या www.pcmcindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर पिंपरी चिंचवड मनपाच्या औद्योगिक प्रशिक्षण विभागामार्फत (दि. १९) रोजी हा आदेश प्रसिध्द करण्यात आला आहे.
निवड झालेल्या शिकाऊ उमेदवारांना नेमणूक आदेश दिनांकाच्या १० दिवसाच्या आत नियुक्ती प्राधिकारी मा. प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण विभाग, मोरवाडी यांच्या कार्यालयात पुढील कार्यवाहीसाठी कार्यालयीन वेळेत उपस्थित / हजर राहणे बंधनकारक राहील. तदनंतर उपस्थित राहणा-या उमेदवारांचा
शिकाऊ उमेदवार प्रशिक्षणार्थी म्हणून कोणताही विचार केला जाणार नाही, असे महापालिकेच्या वतीने पत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.