न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जानेवारी २०२४) :- अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने तीर्थक्षेत्र सुदुंबरे येथील तुलसी आंगण सोसायटीत विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

परिसरातील महिला आणि लहान मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत रामायणाच्या कथेवर आधारित नृत्य आणि नाटिका सादर करत सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये बहार आणली. पारंपारिक पोशाख परिधान करून सोसायटी आवारातील मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला. मिरवणूकीच्या मार्गावर रांगोळी त्याचप्रमाणे भगवे झेंडे, भगव्या पताका व दिवे लावण्यात आले होते. यावेळी जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या. महाआरती संपल्यानंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
सोसायटीतील लक्ष्मण सुरवसे, महेश सुरवसे, गोविंद चव्हाण, गणेश सोनवणे, अधिक पाटील, राहुल भगत, विशाल काळडोके, विलास घुमरे, आशिष लोखंडे आणि परिसरातील महिला वर्ग आदींचा आयोजनात मोलाचा सहभाग होता. या आनंद उत्सवाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
श्रीरामांचे नाव घेता अंधारदेखील प्रकाशात परावर्तित होतो. परंतु, इथे गोष्ट न्यारीच घडली. सोसायटी परिसरातील नादुरुस्त दिव्यांमुळे प्रकाशाअभावी येथील नागरिकांना अंधारातच श्रीरामांचा उत्सव साजरा करावा लागला, त्याचे वाईट वाटते अशा भावना येथील नागरिकांनी ‘न्यूज पीसीएमसी’शी बोलताना व्यक्त केल्या.











