- तरीही एसआरएचे कार्यालय थाटणार पुण्यात..
- झोपडपट्टीधारकांच्या अडचणीत पुन्हा भर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जानेवारी २०२४) :- पुण्यातील संगमवाडी येथील प्रस्तावित जागेत झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे कार्यालय उभारण्यास राज्य सरकारने खासगी विकसकाला मान्यता दिली आहे. त्यामुळे अधिक झोपडपट्ट्यांची संख्या असणा-या पिंपरी-चिंचवड शहराऐवजी पुण्यात झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे (एसआरए) कार्यालय स्थापन करण्यात येणार आहे. यामुळे पिंपरी- चिंचवडमधील झोपडपट्टीधारकांना प्रत्येक कामासाठी पुण्याला हेलपाटे मारावे लागणार आहेत.
पिपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात ७२ झोपडपट्ट्यांची नोंद आहे. त्यामध्ये दापोडो, फुगेवाडी, गांधीनगर, सेक्टर २२, महात्मा फुलेनगर, बाजालीनगर, आनंदनगर, उद्यमनगर, विद्यानगर अशा घोषित व अघोषित झोपडपट्ट्यांचा यात समावेश आहे.
ही संख्या मोठी असल्याने त्यांना सुविधा देणे महापालिकेला बंधनकारक असले तरी त्यांचा पुनर्विकास शक्य नसल्याने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून झोपडपट्ट्या विकसित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे त्याचे सर्वेक्षण आणि नागरिकांचे फॉर्म भरून घेण्याचे काम सुरु आहे, परंतु, त्यासंदर्भात तक्रारी मांडायच्या कुठे आणि त्या सोडविणार कोण? अशी चिंता नागरिकांना लागली आहे.















