न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. १९ एप्रिल २०१९) :- शितल मारुती कोरडे-चौरे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कला शाखेमधून मराठी विषयातील ‘स्वातंत्र्यपूर्व काळातील स्रीआत्मचरित्रांचे स्त्रीवादी आकलन’ या विषयातून संशोधन करून, पीएच. डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्या संशोधनासाठी मराठी विभागातील प्रा. डॉ. मनोहर जाधव यांनी मार्गदर्शन केले.
त्यांच्या मौखिक परीक्षेसाठी बहिस्थ परीक्षक म्हणून कोल्हापूर विद्यापीठातील मराठी विभागाचे माजी विभागप्रमुख आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील महात्मा फुले अध्यासनाचे विद्यमान प्रमुख प्रा. डॉ. विश्वनाथ शिंदे उपस्थित होते. पीएच. डी. मौखिक परीक्षेसाठी चेअरमन म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रमुख आणि मराठी विषयाच्या अभ्यास मंडळाचे विद्यमान सदस्य प्रा. डॉ. प्रभाकर देसाई उपस्थित होते.
शीतल कोरडे-चौरे यांचे संशोधन स्वातंत्र्यपूर्व काळातील स्त्री जीवनावर आणि भारतीय आणि पाश्चात्त्य स्त्रीवादावर प्रकाश टाकणारे आहे. त्यामुळे येणाऱ्या नवीन संशोधन अभ्यासकांना त्यांचे संशोधन मार्गदर्शक ठरेल, अशा स्वरूपाचे मत प्रा. डॉ. विश्वनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. त्यांच्या मौखिक परीक्षेसाठी मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. तुकाराम रोंगटे, प्रा. डॉ. विद्यागौरी टिळक, प्रा. डॉ. संजय नगरकर तसेच यांच्या कुटुंबातील नातेवाईक, मित्रपरिवार आणि बहुसंख्येने विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.











