- ‘आडवे आलात तर मुडदा पाडीन’; रहिवाशांना टोळीची धमकी…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जानेवारी २०२४) :- कामावरुन घरी आल्यानंतर फिर्यादी त्यांच्या दोन मित्रांबरोबर चाळीमध्ये गप्पा मारत होते. त्यावेळी त्यांच्याच चाळीतील फिर्यादी यांचा ओळखीचा इसम व त्याचे दोन अनोळखी साथीदार तिथे त्यांच्या स्कुटीवरुन आले. त्यांनी फिर्यादीस लाथाबुक्यांनी मारहाण केली. आरोपीने त्याच्या कंबरेला असलेला कोयता काढुन जीवे ठार मारण्याच्या उददेशाने फिर्यादी यांच्या डोक्यावर वार केला.
तेव्हा फिर्यादीने जीव वाचवण्यासाठी उजवा हात पुढे केल्याने आरोपीने उजव्या हातावर वार करीत फिर्यादीस जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादी यांनी आरडाओरडा केला असता आरोपी यांनी ‘आमच्या आडवे कोणी यायचे नाही, आडवे आलात तर मुडदा पाडीन’ अशी धमकी देत हवेत कोयता फिरवुन दहशत निर्माण केली. फिर्यादी यांच्या चाळीतील सर्व लोकांनी त्यांच्या घराचे दरवाजे बंद करुन घेतले. त्यानंतर आरोपी व त्याचे इतर दोन अनोळखी साथीदार तेथुन पळुन गेले, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. २९) रोजी १२.१५ ते १२.४५ च्या सुमारास हिरामण बारणे चाळ, पदमजी पेपर मीलजवळ, थेरगाव येथे घडला. फिर्यादी आनंद सुभाष जेवुरकर यांनी आरोपी आखिल ऊर्फ आदेश सुधीर बाबर इतर दोन अनोळखी व्यक्ती यांच्या विरोधात फिर्याद नोंदविली आहे. वाकड पोलिसांनी ९६/२०२४ भा.द.वि. कलम ३०७,३२३, ५०६ भारतीय हत्यार कायदा कलम ४(२५) सह क्रि. लॉ.अॅम. अॅक्ट ३,७ सह महा. पोलीस अधिनियम ३७ (१) (३), १३५ प्रमाणे आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि माने पुढील तपास करीत आहेत.















