- भोसरी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाकडून वाहनांसह आरोपी जेरबंद…
न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जानेवारी २०२४) :- भोसरी, पिंपरी व इतर भागातून दुचाकींची चोरी करणा-या सराईत चोरटयास भोसरी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने ताब्यात घेवून त्याच्याकडून चोरीच्या एकूण २,३०,००० रुपये किंमतीच्या तब्बल सात मोटारसायकल हस्तगत केल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटारसायकल चोरीचे गुन्हे घडलेल्या ठिकाणांना भेटी देउन परिसरातील सीसीटिव्हीद्वारे बारकाईने पोलीस पथकाने तपास केला. सातत्याने विविध ठिकाणचे सीसीटिव्ही फुटेज तपासत तसेच सदर ठिकाणी सापळे लावुन व मोटारसायकल चोरी करणा-या चोरटयाबाबत माहिती प्राप्त केली. (दि. २६) रोजी चोरटयांचे सीसीटिव्ही फुटेज तसेच सापळे लावुन मोहमंद राशीद शाहीद शेख (वय २० वर्षे, धंदा-वाशिंग सेंटरवर कामास, रा. वल्लभनगर, पिंपरी) याला पीएमटी चौक भोसरी येथून सापळा लावुन ताब्यात घेतले. त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने भोसरी व पिंपरी, शिरुर येथून चोरी केलेल्या होन्डा कंपनीची डिओ, सिडी डिलक्स, अॅक्टीवा, स्प्लेंडर प्लस अशा सात मोटारसायकल काढून दिलेल्या असून त्या गुन्हयाच्या तपासकामी जप्त करण्यात आलेल्या आहेत. त्यांच्याकडून चोरीचे एकूण ०६ गुन्हे उघडकीस आणून रूपये २,३०,००० रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह. पोलीस आयुक्त संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त परि. १ श्रीमती स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त, पिंपरी विभाग बाळासाहेब कोपनर यांच्या सुचना व प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे, पोउनि बालाजी जोनापल्ले, पोउपनि मुकेश मोहारे, सपोफी बोयणे, सपोफौ चव्हाण, पोलीस हवालदार हेमंत खरात, डी बी केंद्रे, रमेश भोसले, मपोहवा मुळे, पोना नवनाथ पोटे, प्रकाश भोजने, तुषार वराडे, स्वामी नरवडे, सागर जाधव, प्रभाकर खाडे, महादेव गारोळे, पोशि साळवे, यांनी केलेली आहे














