न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जानेवारी २०२४) :- पिंपरी चिंचवड शहरातील महापालिकेच्या पाच रुग्णालयात खासगी संस्थेची जेनेरिक औषध दुकाने सुरू करण्यात येणार आहेत. स्थायी समितीने त्या विषयास मंगळवारी मान्यता दिली आहे.
स्थायी समिती सभेत प्रशासक शेखर सिंह यांनी मान्यता दिली. महापालिकेच्या पाच रुग्णालयात खासगी संस्थेची जेनेरीक औषधे उपलब्ध होणार आहेत. महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम), नवीन थेरगाव, आकुर्डी, नवीन जिजामाता, नवीन भोसरी या पाच रुग्णालयांच्या परिसरात जेनेरीक औषध दुकाने सुरू करण्यात येणार आहेत.
अमृत स्टोअर्सच्या धर्तीवर दुकाने सुरू करण्यास महापालिका थेट पद्धतीने भाडेतत्त्वावर जागा उपलब्ध करून देत आहे. त्या संस्थेला १५० ते १८६ चौरस फूट क्षेत्रफळाचे पाच गाळे दरमहा ३२ हजार २४२ रुपये भाडेदराने १० वर्षासाठी देण्यात आले आहे. त्यास आयुक्तांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे











