- हे घातले आहेत महत्वाचे निर्बंध…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ फेब्रुवारी २०२४) :- रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आघाडीच्या डिजिटल पेटीएम पेमेंट बँकेला २९ फेब्रुवारीपासून कोणत्याही ठेवी स्वीकारण्यास बंदी घातली आहे. पेटीएम पेमेंट बँकेला कोणत्याही ठेवी स्वीकारण्याची परवानगी दिली जाणार नाही किंवा ते कोणतेही प्रीपेड बिल पेमेंट, टॉप अप किंवा वॉलेट किंवा ठेव स्वीकारण्यास सक्षम असणार नाही, असं रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.
पेटीएम पेमेंट बँकेला वॉलेटसह कोणतेही क्रेडिट व्यवहार करण्याची परवानगी दिली जाणार नाही. खातेधारक किंवा पेटीएम युजर्सनी याबद्दल काळजी करण्याची गरज नाही. कारण रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, पेटीएम ग्राहकांना त्यांची शिल्लक रक्कम काढण्यासाठी किंवा वापरण्यासाठी कोणत्याही प्रकारचे निर्बंध नाहीत.
आरबीआयने नियमांचे पालन न केल्यामुळे आणि इतर चिंतांमुळे पेटीएम पेमेंट्स बँकेला त्यांच्या सेवांवर नवीन ठेव आणि क्रेडिट व्यवहार स्वीकारण्यास प्रतिबंध केला आहे. लेखापरीक्षण अहवालातील त्रुटी आढळून आल्यानंतर हा आदेश जारी करण्यात आल्याचे आरबीआयने यासंबंधात जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.











