न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (२० एप्रिल २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरात मावळ लोकसभेसाठी येत्या २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मागील वर्षी मतदानाचा टक्का कमी होता. त्यामुळे या वर्षी तो टक्का सुधारावा, यासाठी सायकल रॅलीचे आयोजन केले आहे. याबाबत पिंपरी विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी संदीप खोत यांनी प्रसिद्धीपत्रक काढले आहे.
त्यात त्यांनी म्हटले आहे की, ३३ मावळ लोकसभा मतदार संघ, २०६ (अ. जा.) पिंपरी विधानसभा मतदार संघ, संदीप खोत, मतदार नोंदणी अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली मतदार जनजागृती कार्यक्रम आयोजीत करण्यात येत आहेत.
सन २०१४ चे लोकसभा व विधानसभेचे मतदान टक्केवारी अतिशय कमी आहे. त्यात वाढ करण्यासाठी तसेच लोकशाही समृद्ध व बळकट करणेकरीता मतदानाच्या टक्केवारीत वाढ होणेसाठी तसेच १००% मतदारांनी मतदान करणेकरीता निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार विविध उपक्रम राबविले जात
आहेत. त्याचाच भाग म्हणुन दि. २१ /०४/ २०१९ रविवार रोजी सकाळी ६.३० वाजता सायकल रॅलीचे आयोजन केले आहे.
त्यानुसार पिंपरी विधानसभा क्षेञामध्ये सायकल रॅली काढण्यात येणार आहे. त्यामुळे सदरचे काम हे मतदान जागृती बाबतचे असल्याने त्यामध्ये पिंपरी चिंचवड भागातील सायकलप्रेमी संस्था व सायकल स्वार यांनी जास्तीत जास्त प्रमाणात सायकल रॉलीमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी संदीप खोत यांनी या पत्रात म्हटले आहे.











