- भेटीचे कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ फेब्रुवारी २०२४) :- शहरातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या असिफ महंमद इक्बाल शेख उर्फ असिफ दाढी याने स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रत्यक्ष जाऊन भेट घेतल्याचा फोटो समोर आला आहे. अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर ही भेट झाली असल्याचे समजते. या भेटीचे कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.
असिफ दाढीवर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर खून, किडनॅपिंग, खूनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहे. शस्त्रास्त्रांसह त्याला पोलीसांनी अटकही केली होती.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला व्यक्ती उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतो आणि स्वतः अजित पवार देखील त्याला भेट नाकारत नाहीत. याचा अर्थ ही भेट राजकीय आहे? असिफ दाढी शहराच्या राजकारणात एन्ट्री करणार? असे अनेक सवाल राजकीय जाणकार उपस्थित करू पाहत आहेत.













