- परप्रांतीय तरुणावर गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ फेब्रुवारी २०२४) :- प्रेम प्रकरणात फसवणूक झालेल्या मुलीने हॉस्टेलच्या छताच्या पंख्याला ओढणीच्या साहयाने गळफास लावुन घेत आत्महत्या केली आहे. हा प्रकार (दि. ०३/ १०/२०२३) रोजी व मागिल ३ ते ४ वर्षांपासून आयआयएमएस कॉलेज, मुलींची डेल्टा होस्टेल रूम, हिंजवडी येथे घडला.
मयत २५ वर्षीय तरुणीचे तिच्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. दरम्यान आरोपी तरुण हा मयत तरुणीला सोडून दुसऱ्या मुलीसोबत फिरत होता. तीला तिच्या फ्रेंडच्यासमोर मारहाण करत होता. तिचा अपमान करत होता. तीला मरून जा, मला काही फरक पडत नाही, असे अपमानस्पद बोलत होता.
त्यामुळे आरोपी तरुणाने मयत तरुणीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, अशी फिर्याद मयत तरुणीच्या वडिलांनी नोंदविली आहे. हिंजवडी पोलीस ठाण्यात आरोपी तरुण अश्वनी भारव्दाज (रा. बिहार) याच्या विरोधात १२८/२०२४ भा.द.वि. कलम ३०६ प्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोउपनिरी तुकाराम शेळके हे करीत आहेत.













