न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (२० एप्रिल २०१९) :- पुणे व बारामती लोकसभा मतदारसंघापाठोपाठ आता शिरूर आणि मावळ मतदारसंघातही १५ पेक्षा अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर दोन ईव्हीएमची आवश्यकता आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयोगाकडे अतिरिक्त २ हजार ४०४ ईव्हीएमची मागणी केली होती.
या अतिरिक्त मशीन जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघात ३१ उमेदवार, बारामतीमधून १८, मावळमधून २१ आणि शिरूरमधून २३ उमेदवार रिंगणात आहे. शिरूरमध्ये २ हजार २२७ मतदान केंद्र आणि मावळमध्ये २ हजार ५०४ मतदान केंद्र आहेत.
जिल्ह्यातील चारही मतदारसंघातील मतदान केंद्रांवर दोन ईव्हीएम ठेवले जाणार आहेत. शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघासाठी २९ एप्रिल रोजी मतदान होणार असून प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.











