न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (२० एप्रिल २०१९) :- माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ यांनी आज शनिवार (दि. २०) रोजी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.
प्रवेश करतेवेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, नगरसेवक नाना काटे, हनुमंत गावडे, भाऊसाहेब भोईर, डब्बू आसवानी, राजू मिसाळ, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर व आदी उपस्थित होते.
२०१७ सालच्या महापालिका निवडणुकीत शेखर ओव्हाळ यांनी राष्ट्रवादीला सोडचिट्ठी दिली होती. आमदार लक्ष्मण जगताप यांनी ”चलो भाजप” मध्ये केलेल्या आवाहनास साद देत, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता व हातात कमळ घेतले होते. त्यांची पून्हा घरवापसी झाली असून, त्यांनी आता पून्हा घड्याळास जवळ केले आहे. त्यांच्या या निर्णयाने पार्थ पवार यांना नक्कीच फायदा होणार, असे दिसते.











