- दलित-मुस्लिम-परप्रांतीय-मराठा महासंघघाचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शाहीद हाफीज फारूख शेख
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (२० एप्रिल २०१९) :- दलित-मुस्लिम-परप्रांतीय-मराठा महासंघ शिरूर लोकसभा निवडणुकीस सामोरे जात आहे. या संघटनेच्या वतीने शिरूर लोकसभा मतदारसंघातून शाहीद हाफीज फारूख शेख यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे.
या संदर्भात माहिती देण्याकरीता आज शनिवार (दि. २०) रोजी पिंपरी येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माहिती देताना, हाफीज शेख म्हणाले की, सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मोदी व भाजप सरकार लोकांना भुलथापा देऊन सत्तेवर आले आहे. सत्तेवर आल्यापासुन मोदी व भाजप सरकारने जनतेची दिशाभूलच केली आहे. मोदींना सरकार चालवण्याची अक्कल नाही. ज्याला स्वतःचे आई-वडील-पत्नी संभाळता आली नाही, तो देश काय सांभाळणार. मोदींनी परदेशी दौऱ्यावर व स्वतःच्या मेकअपवर कितीतरी हजारो करोड रूपये खर्च केले आहेत. त्या पैशात शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले असते.
तसेच भारतातील कारागिरांना मिळणारा रोजगार चीनकडे वळवून देशातील कारागिरांना देशोधडीला लावले आहे. बुलेट ट्रेनच्या खर्चात भारतातील रेल्वे अधिक सक्षम करता आली असती, संपूर्ण देशात रेल्वेचे जाळे विस्तारता आले असते. परंतु, मोदींनी ते केले नाही. राफेल विमान खरेदीत मोदींनी अंबानी-अदानी बंधूंना फायदा मिळवुन दिला. महामार्गावर केलेला खर्च वसुल झालेला असतानादेखील अद्यापही अनेक ठिकाणी टोलवसुली चालूच आहे. मोदी सरकारने केलेल्या नोटाबंदीमध्ये नाहक १२० लोकांचा बळी गेला. नोटाबंदीतुन काहीही साध्य झालेले नाही. त्यामुळे त्या १२० लोकांच्या हत्येस मोदींना जबाबदार धरून त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे.
२०१४ च्या निवडणुकीत पक्षाने कॉंग्रेसऐवजी भाजपला पाठिंबा दिला होता. परंतु, मोदी सरकारला पाठींबा देण्याचा तो निर्णय आमचा फसला. मोदी देशातील महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष न देता, मुस्लीम समाजातील तिहेरी तलाकमध्ये ते नाक खुपसतात. देशातील जनतेला काय विकासकामे केली ते न सांगता ते जातीधर्मावर मत मागत फिरत आहेत. मोदी सरकारने कोणतेही ठोस विकासकामे न करता, केवळ खोटे बोलण्याचा पराक्रम केला आहे. आतापर्यंत भारतात एवढे पंतप्रधान झाले. परंतु, मोदींसारखा एवढे खोटे बोलणारा पंतप्रधान झालाच नाही. मोदी केवळ खोटे बोलून लॉंलीपॉप दाखवतात.
शिरूरच्या दोन्ही उमेदवारांबद्दल बोलताना ते म्हणाले की, ते दोन्ही उमेदवार एकाच माळेचे मणी आहेत. राष्ट्रवादीचे डॉ. अमोल कोल्हे हे पुर्वाश्रमीचे शिवसेनेचेच आहेत. त्यामुळे खासदार शिवाजीराव आढळराव व डॉ. अमोल कोल्हे यांच्या मतांमध्ये विभाजन होऊन, त्याचा फायदा आमच्या उमेदवाराला नक्कीच होणार असल्याचे सांगितले.
शिरूर लोकसभा मतदारसंघाचे दलित-मुस्लिम-परप्रांतीय-मराठा महासंघाचे अधिकृत उमेदवार शाहीद हाफीज फारूख शेख यांना भारतीय राष्ट्रीय रिपब्लिकन पार्टी, दलित सोशालिस्ट पार्टी, हॉकी फेडरेशन, दलित, मुस्लिम, सीख, इसाई, परप्रांतीय, मराठा महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मोहसीन युवा मंच व शिरूर लोकसभेचे अपक्ष उमेदवार वहीदा शेख यांनी पाठिंबा दर्शविला आहे.
या मुद्द्यांवर लढवत आहेत निवडणूक :-
१. एमआयडीसी आरक्षण जागेवर, सोलार सिस्टीम, गेस्ट हाऊस, गार्डन व्यायाम शाळा, ग्रंथालय मोफत.
२. सर्व जाती जमातीचे धार्मिक गुरु यांना दोन वर्षात मोफत घर.
३. बेरोजगारांना ५० हजार लघुउदयॊग देणार तीन वर्षासाठी टॅक्स नाही.
४. शेतकऱ्यांना वीज वाटप, खाद्य वाटप, आणि कोल्ड स्टोरेज गव्हर्मेंट कडून मोफत आणि शेतकरी ते डायरेक्टर रिटेलिंग शेत मालाची विक्री आणि स्टॉल .
५. महिलांसाठी घरी बसून स्वदेशी उद्योग परदेशी बाहेरील मालावर बहिष्कार.
६. गॅस वीज सवलतीच्या दरात सहकार्य, सर्व जाती जमातीच्या धर्मगुरूंच्या कुटुंबियांना मोफत ओषधे.
७. विकलांग साठी रोजगार हमी योजना.
८. १० लाख पर्यंत व्यवसाय करणाऱ्या व्यापाराना कर माफी.
९. जीएसटी ला पूर्णतः विरोध, रेराला विरोध, पेट्रोल, डिझेल, सीएनजी, घरगुती गॅस दर कमी झाले तर कमी करा, दर वाढले तर वर्षातून एकदाच वाढवा.
१०. पुणे शिरूर मतदारसंघातील गरिबांना २५ हजार घर मोफत.
११. झोपड पट्टी वासियांना उच्च दर्जाची घरे मिळतील. ज्यांचे घर १०० चोरस फूट असेल त्यांना २५० चोरस फूट घर मिळेल. जनतेचं सेवे साठी बारा तास कार्यालय उपलब्ध सर्व वॉर्डात सोलार सिस्टीम व विजेची बचत.
१२. पुणे ते नाशिक रेल्वे प्रकल्पाचा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेणे शेतमालाला योग्य हमी भाव मिळून देणे. हडपसर सय्यद नगर येथे उड्डाण पुलाचा प्रोजेक्ट मार्गी लावणे.
१३. मतदार संघातील रस्ते, पाणी, वीज, हॉस्पिटल, या सारख्या सुविधा उपलब्ध करून देणे.
१४. गाव तेथे ग्रंथालय क्रीडांगण शिक्षणासाठी मुलां मुलींसाठी वस्ती गृह प्रेत्यक स्पर्धा परीक्षा मार्ग दर्शन केंद्र व प्रशिक्षन केंद्र उपलब्ध.
१५. समाजातील सर्व घटकांना एकत्रित घेऊन अनू. जाती- जमाती या साठी केंद्राचा भरपूर निधी मिळवून तो कोशल्य विकासावर आधारित प्रशिक्षण केंद्रे सुरु करणे व निधी उपलब्ध करणे.
१६. पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी एक नवीन धरण उपलब्ध करणे .











