न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मावळ (२० एप्रिल २०१९) :- आपल्या पाच मित्रांसोबत पर्यटनासाठी आलेल्या २३ वर्षीय इंजिनिअरचा पवना धरणात बुडून मृत्यू झाला. अतुल अनिलकुमार गगन असे मृत इंजिनिअरचे नाव आहे.
अतुल हा आपल्या मित्रांसोबत पाण्यात पोहोण्यासाठी उतरला. परंतु पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. लोणावळा पोलिसांनी शिवदुर्ग रेस्क्यू टीमच्या साह्याने अतुल गगन याचा मृतदेह पाच वाजेच्या सुमारास पाण्यातून बाहेर काढला.
अतुल हा म्हणून कार्यरत होता. पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी खासगी रुग्णालयात पाठवला असून अधिक तपास लोणावळा पोलीस करत आहेत.











