न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ एप्रिल २०१९) :- हनुमान जयंती निमित्त शुक्रवार (दि.१९) रोजी खराळवाडी येथे धर्म रक्षा समितीतर्फे महाप्रसादचे आयोजन करण्यात आले होते.
पहाटे ५ वाजता हनुमान जन्म व पूजा करण्यात आली. सकाळपासून रात्रीपर्यंत अनेक धार्मिक विधी, उपक्रम आणि महाप्रसादाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. व नागरिकांनी सहकार्य दिले.
त्या ठिकाणी नागरिकांनी १०० % मतदान करावं यासाठी मतदार जागृतीदेखील करण्यात आली. हा कार्यक्रम उत्तमरित्या पार पाडण्यासाठी समितीतील कार्यकर्त्यांनी उत्तम कार्य केले.











