- देहूलगत येलवाडीत होणार ‘उपकृषी उत्पन्न बाजार समिती’ची स्थापना..
- उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून गायरानातील जागा देण्याचे निर्देश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ फेब्रुवारी २०२४) :- खेड तालुक्यातील तीर्थक्षेत्रे येलवाडी येथील नियोजित रिंगरोड लगत गट क्रमांक ३०० मधील १९ हेक्टर ३३ आर इतकी शासकीय गायरानातील जागा चाकण कृषी उपन्न बाजार समितीला देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
याचाबत पुण्याचे जिल्हाधिकारी यांना ४ जानेवारी रोजी निर्देशपत्र दिले आहे. तसेच, या पत्राची एक प्रत खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनादेखील उपसचिव गजानन पाटील यांनी पाठविले आहे. आता याबाबत पुणे जिल्हाधिकारी कधी कार्यवाही करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चाकण व परिसरातील वाढत्या शहरीकरणामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार येथील जागा दिवसेंदिवस कमी पडत आहे. त्यामुळे चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीने जागा देण्याची मागणी येलवाडी ग्रामपंचायतीकडे केली होती.
चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने येलवाडी येथे उपकृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन करण्यासाठी येथील गायरानातील जागेची मागणी केली होती. या गायरानातील जागा ही येलवाडी ग्रामपंचायतीकडे देखभालीसाठी आहे. या ठिकाणी उपकृषी उत्पन्न बाजार समिती झाली तर, या येलवाडी व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना चांगला फायदा होणार आहे. तसेच, अनेक स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
– मा. रणजित गाडे, सरपंच – येलवाडी ग्रामपंचायत…