न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ एप्रिल २०१९) :- “जागतिक वसुंधरा दिन” यानिमित्ताने प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समिती च्या वतीने रविवार (दि. २१) रोजी प्राधिकरण पेठ क्रमांक २८ येथील संत ज्ञानेश्वर उद्यान येथे आयुर्वेदिक झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
वाढते शहरीकरण तसेच वाढत्या तापमानाचा फटका पिंपरी चिंचवड शहराच्या वृक्षसंपदेला बसत आहे. तापमानाचा पारा एप्रिल च्या सुरुवातीलाच ४० डिग्री सेल्सिअस च्या पार पोहचला आहे. याचे मुख्य कारण शहराचा घटता हरितपट्टा आहे. अनेक झाडे पाण्याअभावी जळून गेली आहेत. याकरिता शहरात वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात होणे आवश्यक आहे.
जागतिक वसुंधरा दिनाच्या निमित्ताने समितीने वृक्षारोपणास प्राधिकरण येथून सुरूवात केली. यासाठी समिती अध्यक्ष विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण विभागाचे अभ्यासक विजय मुनोत, अर्चना घाळी दाभोळकर, बाबासाहेब घाळी, संतोष चव्हाण, सुदेश बोराटे, अमित डांगे, सतिश देशमुख, संदीप सकपाळ, मंगेश घाग, विशाल शेवाळे, अजय घाडी, तेजस सापरिया, नितीन मांडवे त्याचप्रमाणे जेष्ठ महिला संघाच्या गिरीजाबाई इंगळे, उषा काळे, शकुंतला थोरात, उर्मिला पाटील, जुलेखा शेख, शालिनी खुळे, पद्मावती कापडे, मालती अय्यर, सिंधू शिर्के यांनी पुढाकार घेतला आहे.
या निमित्ताने पर्यावरण अभ्यासकांनी महापालिका पर्यावरण विभागावर नाराजी व्यक्त केली, “जागतिक वसुंधरा दिना” चे पालिकेस गेले अनेक वर्षांपासून विस्मरणच होत आहे पालिकेने पुढाकार घेऊन वसुंधरा दिन शहरात मोठ्या प्रमाणात सादर करणे आवश्यक आहे. शहराच्या वृक्षसंपदेच्या वैभवात वाढ करण्यासाठी पालिकेने स्वतः पुढाकार घेणे आवश्यक आहे.
समितीच्या वतीने प्राधिकरण परिसरामध्ये ३०० आयुर्वेदिक व पक्षांच्या अन्नसाखळी करिता उपयुक्त असणारी फळझाडे आंबा, चिंच, उंबर, जांभूळ, पेरू, कडुलिंब, चिकू यांचे रोपन केले तसेच त्यांचे संवर्धन करण्याचा संकल्पही करण्यात आला.











