न्युज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ एप्रिल २०१९) :- ३३ मावळ लोकसभा मतदार संघ, २०६ (अ.जा.) पिंपरी विधानसभा मतदारसंघ कार्यालयातील संदीप खोत, मतदार नोंदणी अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली विविध मतदार जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहेत. मागील लोकसभा व विधानसभेचे मतदान टक्केवारी कमी आहे .त्यात वाढ करण्यासाठी तसेच लोकशाही समृद्ध व बळकट करणेकरीता जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार विविध उपक्रम राबविले जात आहेत.
त्याचाच भाग म्हणुन रविवार (दि.२१) रोजी सकाळी ६ ४५ वाजता डॉ. हेडगेवार भवन आकुर्डी येथुन सायकल रॅली आयोजीत करण्यात आली होती. रॅली आकुर्डी, निगडी, पिंपरी, चिंचवड मार्गे परत आकुर्डी येथे संपन्न झाली. सदर सायकल रॅलीमध्ये संदीप खोत, मतदार नोंदणी अधिकारी, आण्णा बोदडे सहा. आयुक्त, माहिती व जनसंपर्क विभाग, स्विप प्रसिध्दी समितीचे रमेश भोसले, मुकेश कोळप, प्रफुल्ल पुराणिक, तानाजी सावंत तसेच पोलीस उपनिरिक्षक संदिप ओव्हाळ व वाहतुक विभागाचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
त्याचप्रमाणे सायकल मिञ संस्था – साहय रायडर्स मिञ परिवार, निसर्ग सायकल मिञ, इंडो सायकल क्लब, सायकल मिञ,गांधीपेठ तालीम मिञ मंडळ चिंचवड, जेष्ठ नागरिक संघाचे सुर्यकांत मुथियान व संस्कार प्रतिष्ठानचे डॉ.मोहन गायकवाड यांनी देखील त्यांचे कार्यकत्यांसह सायकल रॅलीमध्ये सहभाग घेतला.
सायकल रॅलीमध्ये मतदारांना मतदान करण्याबाबतच्या घोषणा असलेले फलक सायकलवर लावुन तसेच मतदान करण्याच्या घोषणा देत रॅली संपन्न झाली. रॅलीचा समारोप डॉ हेडगेवार भवन येथे मतदान करण्याची सामुहिक शपथ घेऊन करण्यात आला.











