न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ फेब्रुवारी २०२४) :- राजगड पार्क व माऊली हाउसिंग सोसायटी, मोरे वस्ती, चिखलीच्या वतीने सार्वजनिक शिवजयंती उत्सव वर्ष २०२४ दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपारिक पद्धतीने शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.
रक्तदान शिबिर, गड किल्ल्यांचे प्रदर्शन आणि पारंपरिक पद्धतीने ढोल ताशा व पालखीचा समावेश मिरवणुकीत करण्यात आला. रक्तदान शिबिरात ३६ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
गड किल्ले सेवा संस्था यांच्या माध्यमातून गड किल्ल्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. त्यामध्ये महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरील किल्ल्यांचे फोटो व त्याची माहिती प्रदर्शनात देण्यात आली. संध्याकाळी ढोल ताशांच्या गजरात आणि महाराजांना पालखीत बसून पारंपारिक पद्धतीने वेशभूषा करून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक नंतर लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कार्यक्रम सादर करणार आले. राजगड पार्क व माऊली हौसिंग सोसायटीतील सर्व सदस्यांनी कार्यक्रमासाठी मेहनत घेतली.















