न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ फेब्रुवारी २०२४) :- दोन अल्पवयीन बालकांचा बालविवाह लावण्यात आला आहे. हा प्रकार (दि. १९) रोजी सायंकाळी ०५.०० च्या सुमारास सुत्रबंधन सामाजिक संस्था, आळंदी देवाची येथे घडला.
फिर्यादी राहुल विनोद शर्मा यांनी आरोपी सुत्र बंधन सामाजिक संस्थेतील सदस्यांविरुध्द व विवाहास उपस्थित इसमांविरुध्द फिर्याद नोंदविली आहे. आळंदी पोलिसांनी ३९/२०२४, बालविवाह प्रतिबंधक अधिनियम कलम १० व ११ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सपोनि साळी पुढील तपास करीत आहेत.













