- ‘मोदीमुक्त भारत मोहिम’ शहर व जिल्हा मनसे, शिरुर व मावळ मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा संपन्न
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ एप्रिल २०१९) :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ‘मोदीमुक्त भारत’ मोहिमेकरीता पिंपरी चिंचवड शहर व जिल्ह्याच्या वतीने शिरुर व मावळ लोकसभा मतदारसंघातील मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ता यांचा भव्य मेळावा रविवार (दि. २१) रोजी वाल्हेकरवाडी परिसरातील आहेर गार्डन येथे आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्यास मनसेचे नेते नितीन नांदगावकर, बाबु वागस्कर, गणेश आप्पा सातपुते, रणजित शिरोळे, किशोर शिंदे, रुपेश माहळस्कर, दिपक हुलावळे, देहुरोड शहर अध्यक्ष मोजेस दास, मनसे पिं. चिं. शहराध्यक्ष सचिन चिखले, महिला अध्यक्षा अश्विनी बांगर, उप शहरप्रमुख बाळा दांनवले, राजु साळवे, अंकुश तापकिर, विद्यार्थी सेना अध्यक्ष हेमंत डांगे, सचिव रुपेश पटेकर, सहसचिव सिमा बेलापुरकर, विभाग अध्यक्ष दत्ता देवतरासे, संजय यादव, मयुर चिंचवडे, शाम जगताप, विशाल मानकरी, राहुल जाधव, महिला उपशहर अनिता पांचाळ, संगिता देशमुख, स्नेहल बांगर, विभाग अध्यक्ष रुपाली गिलबिले, सुजात काटे, विद्या कुलकर्णी, अदिती चावरीया, सुनिता गायकवाड, मिना गटकळ, उप विभाग अध्यक्ष नितीन चव्हाण, पंकज दळवी, ओंकार पाटोळे, मिलिंद सोनवणे, गुरूनाथ शिंगारे, अजय कुदळे, ऐलेक्स, रवी सुर्यवशी, सचिन कळकुभे, निलेश नेटके, सचिन कांबळे, सुरेश सकट, राम दहिफळे, फयाज नदाफ, तेजस दाते, गणेश लोणारे, स्वप्निल दरे, प्रतिक जिते, सतोष जाधव, सखाराम मटकर, सचिन मिरपगार, अक्षय करडे, उत्कर्ष भोसले, नाथा शिंदे, सिध्दराम कोळी, गणेश पाटील, नारायण पठारे, महेंद्र यादव, सुशांत साळवी तसेच अनेक पदाधिकारी व मनसैनिक उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ५०० मनसैनिकांचा प्रवेश करण्यात आला.

कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना नितीन नांदगावकर म्हणाले की, ”मी राज सैनिक आहे. ही पदवी मला राज साहेबांनी दिली आहे. देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी व अफ़ज़ल खान (अमित शहा) या दोन जोडगोळीच्या पाशातून मुक्त करावयाचे आहे. मोदीमुक्त नारा देणारे भारतातील राज ठाकरे हे पहिले नेते आहेत. भाजपच्या कारकिर्दीत देश रसातळास पोहचला आहे. त्यामुळे देशावर जागता पहारा देण्याची हीच वेळ आहे. कारण चौकीदारच चोर निघाला आहे. भाजप मतासाठी जवानाचा मुद्दा पुढे करत आहे. सैनिकांच्या मुद्द्यांवर भाजप सरकार खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करत आहे. चांगल्या बँका बंद पडत चालल्या आहेत. तसेच देश आर्थिक संकटात सापडत चालला आहे. ही किड काढुन टाकण्याची वेळ आता आपल्यावर आली आहे.
बाबु राजेंद्र वागस्कर म्हणाले की, ”शहरातील पक्ष बांधणी चांगल्या प्रकारे चालु आहे. मनसेचे राजकीय वज़न देश पातळीवर आहे. पक्षाने भाजपविरोधी प्रचार चालु केल्यामुळे भाजपच्या २० जागा कमी होतील, असा अंदाज वर्तवला.
गणेश सातपुते यांनी मनसे निवडणुक लढवत नाही. पण मनसेची राज्यभर जोरदार चर्चा आहे. पक्षात प्रत्येक कार्यकर्ता व पदाधिकारी यांचा उत्साह व जल्लोष पहायला मिळत आहे. राजसाहेब यांनी राज्य व संपूर्ण देशाचे हित पाहिले आहे. राज्यामध्ये मुले पळवण्याची टोळी सक्रिय होतीच, आता तर बाप पळवणारी टोळीसुद्धा सक्रिय असल्याचे त्यांनी सांगितले.
रुपाली पाटील यांनी भाजपला मतदान करु नका व हिटलरशाहिला बळी पडु नका. साध्वीचा निषेध व्यक्त करत आहोत. भाजप शहीद झालेल्या माणसावर पण राजकारण करत आहे. मोदी-शाह यांना राजकीय पटलावरुन हाकलुन द्या. भाजपला मतदान करु नका, असे आवाहन केले.
रणजित शिरोळे यांनी पिंपरी चिंचवड शहरामध्ये पक्षाविस्तर होत आहे. शहरातील नद्यांचे प्रदूषण व जलपर्णी, मेट्रो तसेच वाढत चाललेली वाहतुककोंडी या प्रमुख विषयांमध्ये हात घालून रस्त्यावर जात आहे. मोर्चे, आंदोलनाच्या माध्यमातून जनतेसाठी लढा देत आहे. हे प्रशंसनीय काम असल्याचे त्यांनी सांगितले.
किशोर शिदे यांनी मोदीमुक्त भारत करण्यासाठी मावळमधुन श्रीरंग बारणे व शिरूरमधुन खा. आढळराव यांना घरी बसवा. त्यासाठी राज ठाकरे मुलुखमैदानी तोफ गाजवत आहेत. त्यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचवा व देशात तसेच मावळ व शिरूरमध्ये परिवर्तन घडवा, असे आवाहन यावेळी कार्यकर्त्यांना केले.











