न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. २२ एप्रिल २०१९) :- भाजप-रासप-आरपीआय-महासंग्राम-रयत क्रांती संघटना महायुतीचे शिरूर लोकसभेचे उमेदवार व खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा प्रचार जोमात सुरु आहे.
आमदार महेश लांडगे याच्या मार्गदर्शनाखाली स्वी. नगरसेवक दिनेश यादव व कार्यकर्त्यांनी आज सोमवार (दि. २२) रोजी प्रचार दौऱ्यानिमित्त चिखलीतील कुदळवाडी परिसरात विविध ठिकाणी भेटी दिल्या.
यावेळी मार्केट परिसरात जाऊन व्यापारी व नागरिकांशी संवाद साधण्यात आला व त्यांना खासदार आढळराव यांच्या विकासकामांची माहिती देण्यात आली. तसेच महायुतीचे उमेदवार व खा. आढळराव यांना मतदान करण्याचे आवाहनही करण्यात आले, असे यादव सांगितले.











