न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ एप्रिल २०१९) :- दापोडी परिसरात भुयारी मार्गाचे काम दोन वर्षांपासून रखडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील दापोडी येथील लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरील (सीएमई) भुयारी मार्गाचे काम अंतिम टप्यात आले आहे.
पूल खुला झाल्यानंतर पिंपरीतील नागरिकांना पुणे शहरात जाण्यासाठी सर्व्हिस रस्त्याचा वापर न करता उड्डाणपुलाने जाता येणार आहे. तसेच, बीआरटी मार्गातून बस चालकांनाही अडथळा विरहित बस नेता येणार आहेत. सद्यस्थितीत हा मार्ग पूर्ण होत आल्याने नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.











