न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २३ एप्रिल २०१९) :- पुणे आणि बारामती लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान पार पडत आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातून ३१, तर बारामती मतदारसंघातून १८ उमेदवार रिंगणात आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत पुण्यात एकूण १३.८० टक्के तर बारामतीत एकूण १७.४६ टक्के मतदान झाले आहे.
पुण्यामधील दुपारी १२ वाजेपर्यंत निवडणूक टक्केवारी
वडगाव शेरी – १५.६०%
शिवाजीनगर – १५.६०%
कोथरुड – १७.०५%
पर्वती – १७.८९%
पुणे कॅन्टोन्मेंट – १२.०६%
कसबा पेठ – १२.२३%
एकूण – १३.८०%











