- उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना माहिती पाठविण्याचे आवाहन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ फेब्रुवारी २०२४) :- क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फॉउंडेशनच्या वतीने “जागतिक महिला दिन २०२४” चे शुक्रवारी (दि. ०८/०३/२०२४) रोजी न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल, रहाटणी या ठिकाणी आयोजन करण्यात आले आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त संस्थेतर्फे गेली १० ते १२ वर्षापासुन महिलांचे जनजागृती, सक्षमीकरण तसेच समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करण्यात महिलांचा उचित असा सत्कार करण्यात येणार आहे. “सन्मान स्त्री शक्तीचा” या कार्यक्रमात “क्रांतीज्योती मी सावित्रीबाई बोलते” सादरकर्त्या महानंदा डाळिंबे (प्रवचनकार) यांचा एकपात्री प्रयोग होणार आहे.
संस्थेतर्फे रहाटणी, काळेवाडी, पिंपळे सौदागर, थेरगाव परिसरातील साहित्य, कला, क्रीडा, योग, पत्रकार, सफाई कामगार, संस्कृती, डॉक्टर, शिक्षण, उद्योग, कृषी, वकिली क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे. सबंधित क्षेत्रातील महिलांनी आपली सविस्तर माहिती ०६/०३/२०२४ पर्यंत न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल, रहाटणी (9764524769/9921695242) येथे पाठवावी, अशी माहिती संस्थेचे मुख्याध्यापक नाजनीन शेख व उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत ह्यांनी दिली.













