- राज्यपालांच्या सहीने महाराष्ट्र अधिनियम १६ संपूर्ण राज्यात लागू – विजयकुमार पाटील…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ फेब्रुवारी २०२४) :- मराठा समाजास सामान्य प्रशासन विभागाने अध्यादेश लागू झाल्याची गोड बातमी दिली. सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गाकरिता आरक्षणाच्या तरतुदीनुसार सरळसेवा भरतीसाठी सुधारित बिंदूनामावली विहित करण्यावबाबत शासन निर्णय लागू झाला.
महाराष्ट्र राज्यातील सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गाकरिता आरक्षण अधिनियम २०२४ हा राज्यपालांच्या संमतीने सचिव सतिश वाघोले (विधि विधान) विधि व न्याय विभाग त्याचप्रमाणे खालिद बी अरब सह सचिव महाराष्ट्र शासन यांच्या स्वाक्षरीने अधिनियम क्रमांक १६ राज्यात लागू करण्यात आला. ह्या बिंदूनामावलीचा अवलंब तसेच अध्यादेश प्रसिद्धीमुळे मराठा समाजाच्या व मनोज जरांगे पाटलांच्या लढाईला अर्धे यश मिळाले असे म्हणता येईल.
या संदर्भात मराठा आरक्षण अभ्यासक विजयकुमार पाटील म्हणाले,” या अध्यादेशात अधिनियम संदर्भ क्रमांक ६ महत्वाचा असून सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्गाच्या आरक्षणाचा लाभ मराठा मागास विद्यार्थ्याना मिळेल. थेट १० टक्के त्याचप्रमाणे एस ई बी सी वर्गासाठी मराठा समाजाचा समावेश केल्यामुळे शासकीय व निमशासकीय सेवेतील भरतीत मराठा समाजास १० टक्के वाटा आता असणार आहे. त्याचप्रमाणे राज्यातील सर्व स्वतंत्र्य शासकीय संस्था भरतीमध्ये ही हाच नियम लागू असणार आहे.











