न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ फेब्रुवारी २०२४) :- पिंपरी चिंचवड पोलिसांनी दिशा उपक्रम अंतर्गत विधीसंघर्षीत बालक व गुन्हेगारी मार्गावरील दिशा भरकटलेल्या बालकांसाठी त्यांच्या उर्जेला योग्य दिशा मिळावी या दृष्टीकोणातुन वस्ती/झोपडपट्टी भागात विशेष बाल पथक, गुन्हे शाखा आणि संदेश बोर्ड स्पोटस फाउंडेशन यांच्या मदतीने संपूर्ण शहरात क्रीडा उपक्रम राबविण्यात येतात. या उपक्रममध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडील १८, पोलीस स्टेशनकडील एकुण ३५ पोलीस अधिकारी यांनी आपआपले पोलीस स्टेशन हददीत फुटबॉल मैदान उपलब्ध करुन घेवुन एकुण ३१ फुटबॉल टिम तयार केल्या आहेत. व त्यांना संदेश बोर्ड स्पोर्टस फाऊंडेशनचे फुटबॉल कोचचे मदतीने प्रशिक्षण देण्यात येत आहे.
नुकत्याच नागपुर येथे पार पडलेल्या “स्लम सॉकर” या महाराष्ट्र राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेमध्ये पुणे जिल्हा टीमच्या मुलांच्या संघाने द्वितीय आणि मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक मिळून यश संपादन केले. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी क्रिडा प्रशिक्षकासह सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.
तसेच (दि, २९) पासुन कोलकत्ता येथे होणा-या “स्लम सोकर” या राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल स्पर्धेसाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे वतीने राबविण्यात येणा-या दिशा उपक्क्रमांतर्गत हद्दीतील एकूण २२ उत्कृष्ठ फुटबॉल खेळाडूंची निवड झाल्याने सर्व खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत.
याप्रसंगी विनय कुमार चौबे, सो पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड, वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, डॉ. विशाल हिरे सहायक पोलीस आयुक्त, वाकड विभाग (नोडल अधिकारी, विशेष बालपथक), क्रीडा प्रशिक्षक संदेश बोर्ड व त्यांचे सहकारी कोच, समाजसेविका प्राजक्ता रुद्रवार (रावेत) तसेच विशेष बाल पोलीस पथकाकडील दिशा टीम आदी उपस्थित होते.