न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. २३ एप्रिल २०१९) :- जमिनीच्या व्यवहारात एकाची २२ लाख ५० हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी माजी नगरसेवक व शिवसेना पदाधिकारी यांच्यासह नऊ जणांवर सोमवारी (दि. २२) रोजी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी डॉ. महेश शिवाजी पांढरपट्टे (वय ३३, रा. ताम्हाणे वस्ती, चिखली) यांनी फिर्याद दिली असून, माजी नगरसेवकासह अंगद नारायण चव्हाण, अमित मनानी, अशोक बागलानी, प्रदीप वाघमारे, अनुप सिंग, स्वप्नील काटे, भिवा दास, माणिक रसाळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत चिखली पोलीस अधिक तपास करीत आहेत.











