न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ एप्रिल २०१९) :- ३३ मावळ लोकसभा मतदाना अंतर्गत २०६, पिंपरी विधानसभा मतदार संघाच्या वतीने आज श्रीमती गोदावरी हिंदी विदयालयाचे प्राचार्य, शिक्षक, विदयार्थी आणि विदयार्थीनी यांच्या समवेत मतदान जनजागृतीपर रॅली काढण्यात आली.
यावेळी सहाय्यक आयुक्त तथा नोडल अधिकारी अण्णा बोदडे, विदयालयाचे संस्थापक अध्यक्ष एस.एस. तिवारी, तथा नोडल अधिकारी रमेश भोसले, मुख्याघ्यापक आर.आर मिश्रा, उपमुख्याध्यापिका कुसूम तिवारी, पर्यवेक्षक कुमावत गार्गी, सुषमा पाटील यांच्यासह शिक्षक मिना म्हस्के, सुरेश पांडे, शंकर अञे, सुनिता नेवाळे, सुनिता मुखर्जी, राजेश शुक्ला,पद्मा टकले, उर्मिला अंकुश, आरती जगताप, आरती धाकड, नलिनी सिंह, वंदना पांडे, स्वप्निल चव्हाण, इलिझाबेथ पिंटो, संजय पांडे, अनिता कनवर देवडा, संस्कार प्रतिष्ठानचे डॉ. मोहन गायकवाड स्वीप समन्वयक मुकेश कोळप, तानाजी सावंत व मोठया संख्येने विदयार्थ्यींनी सहभाग घेतला होता.
यावेळी सहाय्यक आयुक्त तथा नोडल अधिकारी अण्णा बोदडे यांनी विदयार्थ्यांना जनजागृतीपर मार्गदर्शन केले. नोडल अधिकारी तथा स्वीप सचिव रमेश भोसले यांनी उपस्थितांना मतदान जनजागृतीपर शपथ दिली. मतदान जनजागृतीपर रॅलीची सुरवात श्रीम. गोदावरी हिंदी विदयालय, आकुर्डी येथून सकाळी ८.०० वाजता झाली व जुना पुणे – मंबई महामार्गावरून प्रतिभा महाविदयालय, काळभोरनगर संपुर्ण परीसर, स्टार बाजार मार्गे पुन्हा गोदावरी विदयालय येथपर्यंत काढणेत आली.











