न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ एप्रिल २०१९) :- पुण्यातील लोकसभा निवडणुकीत चुरस निर्माण न झाल्यामुळेच शहरात सायंकाळी चार वाजेपर्यंत राज्यातील सर्वाधिक कमी मतदान पुण्यात झाले. ‘भाजप-काँग्रेसचे राष्ट्रीय स्तरावरील नेते यंदा पुण्यात फिरकलेच नाही.
त्यामुळे पुण्यातील प्रचाराचे किंवा राजकीय वातावरण तापलेच नाही. परिणामी पुण्यातील मतदारामध्ये निरुत्साह निर्माण झाला, अन् त्याचे प्रतिबिंब मतदानात उमटले. त्यामुळे राज्यातील १५ लोकसभा मतदारसंघात ५२ टक्क्यांच्यावर मतदान होत असताना पुण्यात मात्रलोकसभा मतदारसंघात टक्के मतदान झाले आहे.
उमेदवारी जाहीर झाल्यावरही भाजपच्या गिरीश बापट यांचा प्रचार सुरू होता तर काँग्रेसचेही उमेदवार मोहन जोशी यांची अगदी शेवटच्या टप्प्यात म्हणजे २० ते २१ दिवसापूर्वी उमेदवारी जाहीर झाली. त्यांनाही प्रचाराला वेळ कमी मिळाला. त्यामुळे पुण्यात वातावरण निर्मिती झालीच नाही. राहुल गांधी यांनी विद्याथ्याशी केलेला संवाद वगळता भाजपचे राष्ट्रीय स्तरावरील नेतेही पुण्यात आले नाही. पतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात आले पण त्यांनी सभा घेतली नाही की कार्यकर्त्यांनी संवाद साधला नाही.











