न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ मार्च २०२४) :- मावळ लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार श्रीरंग बारणे आणि शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्यात चांगलीच जुंपली आहे.
दोन्ही उमेदवारांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. नुकतेच श्रीरंग बारणे यांनी संजोग वाघेरे यांच्यावर मी बोलणार नाही. त्यांचा मतदारसंघात थांग पत्ता नाही. त्यांच्यावर काय बोलू असं म्हणत टीका केली होती.
यावर संजोग वाघेरे यांनी पलटवार करत सत्तेसाठी पक्ष बदलणाऱ्यांनी बोलू नये, असा टोला लगावला आहे. संजोग वाघेरे पिंपरीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.