- नगरसेविकेचा मुख्याधिकाऱ्यांना सवाल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ मार्च २०२४) :- देहू नगरपंचायतीच्या वॉर्ड एकमध्ये विकासकामांना प्राधान्य दिले जात नाही. गेले अडीच वर्षात एकही विकासकाम झाले नाही. कामे करताना कोणी दबाव आणते का? असा सवाल देहू नगरपंचायतीच्या नगरसेविका मीना कुराडे यांनी मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे विचारला आहे. तसेच येत्या दहा दिवसांत याचा खुलासा करण्याची मागणी केली आहे.
नगरपंचायत नगरसेविका मीना कुराडे, विशाल काळोखे, शैलेश चव्हाण, वसंत सेनानगर, वेंकट सोसायटी, भीमाशंकर सोसायटी, जय गणेश सोसायटी,
गुरुकृपा सोसायटी, साई दर्शन सोसायटी, संत तुकाराम सोसायटी, विघहर्ता सोसायटी, संभाजीनगर सोसायटी, सद्गुरू सोसायटी येथील नागरिक उपस्थित होते.
याबाबत कार्यालयीन अधीक्षक राम खरात यांनी सांगितले की, ‘वॉर्ड क्रमांक एकमधील नगरसेविका आणि नागरिक आले होते. लेखी निवेदन दिले असून विकास कामांना प्राधान्य देत नसल्याचा आरोप केला आहे. मुख्याधिकारी पुणे येथे गेले होते. निवेदन त्यांना देण्यात येणार आहे.’















