न्यूज पीसीएमसी नेटवर्क
तळेगाव दाभाडे (दि. २४ एप्रिल २०१९) :- मोटारीतून जात असणाऱ्या तरुणीचा दोघांनी विनयभंग केला. तसेच त्यांना जाब विचारणाऱ्या तरुणीच्या भावाला मारहाण केली. या प्रकरणी मंगळवारी (दि.२३) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पीडित मुलीने तक्रार दिली असून (एम एच १ बी एफ ९०३२) क्रमांकाच्या मोटारीतून आलेल्या दोन तरुणांवर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
फिर्यादी तरुणी ही मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास सोमाटणे फाटा परिसरातून तिच्या भावासोबत मोटारीतून जात होती. त्यावेळी त्यांच्या मागून एक दुसरी मोटार आली त्यातील दोघांनी तरुणीकडे बघत अश्लिल हावभाव केले. यावरून पीडितेच्या भावाने जाब विचारला असता आरोपींनी शिवीगाळ करत त्याला मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. तळेगाव दाभाडे पोलीस अधिक तपास करीत आहेत.











