न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चाकण (दि. २४ एप्रिल २०१९) :- शिवसेना भाजप आरपीआय शिवसंग्राम रयत क्रांती महायुतीचे शिरूर लोकसभा मतदार संघाचे अधिकृत उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ शिवसेनाप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांची जाहीर सभा.
सभेचे आयोजन गुरुवार (दि. २५ एप्रिल) रोजी दुपारी तीन वाजता आंबेठाण चौक उड्डाणपुलाजवळ चाकण तालुका खेड जिल्हा पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेला नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाची तोफ गुरुवारी चाकण मध्ये धडाडणार असून विरोधकांवर ते कशाप्रकारे निशाणा साधतील हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.











