न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ मार्च २०२४) :- देहूगावमध्ये (दि. २७) रोजी संत श्रेष्ठ श्री. तुकाराम महाराज बीज उत्सव साजरा होत आहे. येथे मोठ्या प्रमाणावर वारकरी सांप्रदायातील भाविक, वारकरी दर्शनासाठी वाहनातून येत असतात. त्यामुळे देहूगाव परिसरात वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे तात्पुरत्या स्वरुपात वाहतुकीत बदल करण्यात येत आहेत. वाहतुक बदल हा दिनांक २५/०३/२०२४ रोजी दुपारी १२.०० वाजेपासून ते दिनांक २७/०३/२०२४ रोजी रात्रौ २१.०० वाजे पर्यंत अथवा वाहतुक सुरळीत होईपर्यंत (अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून) सर्व प्रकारचे वाहनांचे वाहतुकीसाठी बंद राहील.
तळवडे, महाळुंगे, चाकण वाहतुक विभाग अंतर्गत देहूगाव कमान (जुना मुंबई-पुणे हायये) येथून देहूगावकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनासाठी प्रवेश बंद
करण्यात येत आहे. (सार्वजनिक वाहतुक व दिंडीतील वाहने वगळून), महिंद्रा सर्कलकडून फिजूत्सु कॉर्नर अथवा कॅनबे चौक/आयटी पार्क चौकाकडे येण्यास सर्व प्रकारच्या वाहनांस प्रवेश बंदी करण्यात येत आहे. त्यासाठी महिंद्रा सर्कल ते निघोजे ते मोईफाटा मार्गे डायमंड चौक मार्गे वाहने इच्छितस्थळी जातील.
तळेगाव-चाकण रोडवरील देहुफाटा येथुन देहूगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरुन सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे. या मार्गावरील वाहने एच.पी. चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
नाशिक-पुणे हायवेवरील चाकण तळेगाव चौक तसेच स्पायसर चौक येथून महिंद्रा सर्कल मार्गे आयटी पार्क / कॅनबे चौककडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे. या मार्गावरील वाहने मोशी भारतमाता चौक मार्गे इच्छित स्थळी जातील. तसेच या मार्गावरील वाहने महिंद्रा सर्कल- इन्दुरन्स चौक -एच पी चौक मार्गे इच्छित स्थळी जातील.
देहु कमान ते १४ टाळकरी कमान ते भैरवनाथ चौक हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद आहे. खंडेलवाल चौक ते देहु कमान (मुख्य) ते परंडवाल चौक हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद आहे. जुना पालखी मार्ग (कंद पाटील चौक) ते झेंडे मळा (जकातनाका) जाणारी वाहतुक वन-वे (एकदिशा मार्ग) करण्यात येत आहे. नागरीकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा तसेच देहूगाव परिसरात रहिवाशी वस्ती वाढल्याने पार्किंग व्यवस्थेच्या अभावी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, असे आवाहन पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेमार्फत करण्यात आले आहे.













