न्यूज पीसीएमसी नेटवर्क
सुदुंबरे वार्ताहर (दि. २५ मार्च २०२४) :- होलिका पूजन हे असूर वृत्तीच्या नाशासाठी तसेच सद्वृत्तीच्या रक्षणासाठी लोकांच्या हृदयात असलेल्या शुभ भावनांचे प्रतीक आहे. म्हणून आपण तिला माता म्हणतो आणि आई जशी आपले सगळे अपराध पोटात घेते, तशी होलिकामाता आपले अपराध पोटात घेऊन जाळून टाकते. म्हणून आनंदाने होलिकादहन केले जाते.
मावळ तालुक्यातील सुदुंबरे येथील तुलसी आंगण सोसायटी येथे होळीनिमित्त सामुहिक होलिका दहन करण्यात आले. सोसायटीतील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने होलिका दहनासाठी साहित्य जमा केले होते. रांगोळी काढून गोवऱ्या, नैवैद्य आणि फुलं यांची आहुती देत होलिका दहन केले.
सोसायटीतील लक्ष्मण सुरवसे, गोविंद चव्हाण, अधिक पाटील, नितीन लोखंडे, महेश सुरवसे, माणिक खाडे तसेच महिला आणि बालचमू आदींनी होलिका दहनासाठी परिश्रम घेतले होते.