न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ मार्च २०२४) :- ऐश्वर्यम कम्फर्ट सोसायटी येथे परदेशी पाहुण्यासोबत धूलिवंदन साजरे झाले. यावेळी परदेशी पाहुण्यांनी सोसायटीतील नागरिकांबरोबर रंग खेळत धुलीवंदनाचा आनंद लुटला.
रविवारी रात्री प्रभाग क्रमांक दहा संभाजीनगर एचडीएफसी कॉलनी येथे स्पेन देशाचे नागरिक मिस, ग्लोरिया उंडेव, डॉ मारिया सोकोरो, मिस लूर्ड्स, मिस्टर मॅरेन्यू फ्लोरेस हे भारतीय संस्कृतीचा मोठा सण ‘होळी’ पाहण्यासाठी कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांना होळीविषयी व भारतीय संस्कृती विषयी कॉलनीचे प्रभागाच्या माजी अध्यक्ष अनुराधा गोरखे, कलारंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित गोरखे, डॉ. महेश पाटील यांनी माहिती दिली. ‘होळी रे होळी आणि जय श्रीराम…’ म्हणत स्पेनच्या नागरिकांनी होळी साजरी केली.
कलारंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमित गोरखे म्हणाले, ”भारतीय संस्कृती विषयी उत्सुकता अन्य देशातील नागरिकांना आहे स्पेनमधील नागरिक पिंपरी चिंचवड शहरात आले होते त्यांनी ऐश्वर्या सोसायटीमध्ये येऊन नागरिकांबरोबर धुळीवंदनाचा आनंद घेतला. भारतीय संस्कृती जाणून घेतली. ऐश्वर्यम कम्फर्ट सोसायटी आकुर्डी-चिंचवड अध्यक्ष अमोल गोरखे, सचिव निलेश जाधव, खजिनदार मिलिंद पांडे, सदस्य पंकज ताले, अमित बाबर, कल्याण कलपे, अंकुर पाडेकर, श्रध्दा जाधव यांनी नियोजन केले होते.














