दोन तडीपार तरुणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मार्च २०२४) :- पुणे जिल्ह्यातून दोघांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेले असताना देखील त्यांनी बेकायदेशिरपणे स्वतःजवळ लोखंडी कोयता बाळगला. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून त्यांच्यावर पिंपरी आणि चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी पहिली कारवाई (दि. २५) रोजी रात्री ८.४५ च्या सुमारास पांढरकर चाळ, म्हसोबा मंदीरापाठीमागे दळवीनगर, चिचवड येथे केली. विकास ऊर्फ विक्या अंकुश भिसे (वय २७ वर्षे, रा. दळवी नगर झोपडपटटी चिंचवड) याला ताब्यात घेतले आहे. चिंचवड पोलिसांनी १२५/२०२४ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १४२, ३७(१) सह १३५, भारतीय हत्यार कायवा कलम ४ (२५) प्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मसपोफौ सनदी पुढील तपास करीत आहेत.
दुसरी कारवाई (दि. २६) रोजी रात्री ००.२५ च्या सुमारास विद्यानगर, बसस्टॉप जवळ, चिंचवड येथे सार्वजनिक ठिकाणी येथे केली. आनंद नामदेव दनाने (वय ३१ वर्षे, रा. विद्यानगर, बस स्टॉप मागे, चिंचवड) याला ताब्यात घेतले आहे. पिंपरी पोलिसांनी २५०/२०२४ महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२, ३७(१) सह १३५ व भारतीय हत्यार कायदा ४, २५ प्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पो.ना. पाटील पुढील तपास करीत आहेत.