न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८. मार्च २०२४) :- इको गाडीचा हप्ता न दिल्यामुळे चौघांनी फिर्यादीला धमकी दिली. ‘मी तुला गाडीचा २०,००० रुपये हप्ता दे’ असे सांगुनही तु मला हप्ता का दिला नाही? असे म्हणून तिघांनी हॉकीस्टीकने फिर्यादीला मारहण केली. आरोपी क्र. ४ व २ यांनी त्यांच्या हातातील तलवारीने खल्लास करतो व आरोपी क्र. १ याने मारहाण करत आरोपी क्र. २ याने गाडीतून ‘घोडा घेवुन ये, याला ठोकुन टाकु’ असे धमकावले आहे, असं फिर्यादीत नमूद आहे.
हा प्रकार (दि. २५) रोजी रात्री ०१:०० च्या सुमारास शेठ वडेवाले हॉटेल समोर, चाकण-शिक्रापुर रोड, भोसे, ता. खेड जि. पुणे येथे घडला. फिर्यादी विकी मुरली राजपुत (वय २६ वर्षे, व्यवसाय हॉटेल, रा. भोसे, ता. खेड जि. पुणे) यांनी आरोपी १) प्रतिक जाधव (रा. चाकण), २) भोल्या कुल्हाड, ३) हर्षल तुंबडी (रा. चाकण), ४) विनायक गायकवाड (रा. वासुली फाटा) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चाकण पोलिसांनी २०६/२०२४ भादंवि क ३८६,३२४,३२३,३४ आर्म अॅक्ट ४ (२५) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पोउपनि सुकाळे तपास करीत आहेत.