न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ एप्रिल २०२४) :- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने बीडमधून बजरंग सोनवणे आणि भिवंडीमधून सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी दिली आहे. याआधी शरद पवार गटाने पाच जणांची यादी जाहीर केली होती.
बीड लोकसभा मतदारसंघातून अनेक जण इच्छुक होते. पैकी, ज्योती मेटे आणि बजरंग सोनवणे यांची नावे आघाडीवर होते. बजरंग सोनवणे यांनी २०१९ ला झालेल्या बीड लोकसभेत प्रीतम मुंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवली. मात्र, सोनवणे यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. प्रीतम मुंडे यांनी त्यांचा पराभव केला होता. आता पुन्हा एकदा बजरंग सोनवणे हे प्रीतम मुंडे यांच्या भगिनी पंकजा मुंडे यांच्या विरोधात लढणार आहेत.
पहिल्या यादीत शरद पवार गटाकडून वर्धा – अमर काळे, दिंडोरी – भास्करराव भगरे, बारामती – सुप्रिया सुळे, शिरूर – अमोल कोल्हे, अहमदनगर – निलेश लंके यांना स्थान देण्यात आले आहे.