- नगरपंचायतीचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ एप्रिल २०२४) :- देहू नगरपंचायतीचे मलनिःस्सारण प्रकल्प पंप हाऊस येथे असलेले रोहित्र सव्वा महिन्यात दुसऱ्यांदा चोरीला गेली आहे. वर्षभरातील ही चौथी घटना आहे. नगरपंचायत हद्दीतील गायरानाजवळ इंद्रायणी नदीकाठी मलनिःस्सारण प्रकल्पावरील ट्रान्सफार्मरमध्ये असणारे ऑइल अज्ञात चोरट्यांकडून जमिनीवर सांडविले जाते. तर त्यामध्ये असणारे लाखो रुपयांचे तांबे चोरून नेले. त्यामुळे नवीन ट्रान्सफार्मर लावण्यात येईपर्यंत मलनिः सरण प्रकल्प बंद पडते. २० फेब्रुवारी रोजी अशीच चोरी ही घटना घडली होती. त्यानंतर बीज सोहळा २७ फेब्रुवारीला असल्याने नगरपंचायत प्रशासनाने साडेआठ लाख खर्च करून तातडीने ट्रान्सफार्मर बसविले.
ट्रान्सफार्मर बसविल्यानंतर मंगळवारी (दि. २) पुन्हा चोरीची घटना घडली आहे. अशी वर्षभरामध्ये चार वेळा घटना घडल्याने नगरपंचायतीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
नगरपंचायतीचे वायरमन रवींद्र भालेकर यांनी याबाबत देहूरोड पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. ३) अज्ञात चोरट्याच्या विरोधात फिर्याद नोंदवली आहे. वारंवार घडणाऱ्या या घटनेमुळे नगरपंचायतीच्या मालमत्ता सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण होत आहे.