न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ एप्रिल २०१९) :- पिंपरी विधानसभा लोकसभा मतदारसंघातील काही मतदान केंद्रे जागेअभावी स्थलांतरीत केले आहेत. याबाबत ३३ मावळ लोकसभा मतदार संघ, २०६ पिंपरी (अ.जा.) विधानसभा मतदार संघ सहा. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रक काढले आहे.
यात त्यांनी म्हटले आहे की, ”लोकसभा निवडणूक २०१९ करीता २०६ पिंपरी (अ.जा) विधानसभा मतदार संघातील खालीलप्रमाणे मतदान केंद्रांचे ठिकाणांमध्ये जागे अभावि बदल करणेत आलेला आहे. तरी, या मतदान केंद्रांवरील सर्व मतदारांना आवाहन करणेत येते की, बदललेल्या मतदान केंद्रावर जावून, आपला मतदानाचा हक्क बजवावा. याबाबत सविस्तर माहिती फलक संबंधित मतदान केंद्रांवर लावणेत आलेला आहे.
अ. क्र मतदान केंद्र क्र. ठिकाण पूर्वीचे मतदान केंद्र आता असलेले मतदान केंद्र ठिकाण
पासून-पर्यंत
१ १६ ते १८ निगडी पिं. चिं. मनपा मुले शाळा क्र. १, निगडी पिं.चिं.मनपा मुली शाळा क्र. १, निगडी निगडी
२ १४५ व १५३ चिंचवड कमला नेहरु प्राथमिक विद्यालय, चिंचवड स्टेशन दर्शन अकादमी शाळा, एम्पायर इस्टेट फेज १ मुंबई पुणे रोड चिंचवड
३ १४९ व १५१ चिंचवड कमला नेहरु प्राथमिक विद्यालय, चिंचवड स्टेशन महात्मा फुले शाळा क्र.१,(बहिरवाडे) चिंचवड स्टेशन चिंचवड
४ १४६, १५०, १५२, १५४, १५६ व १५८ चिंचवड महात्मा फुले शाळा क्र. २, चिंचवड स्टेशन एम.आय.डी.सी. ऑफिस, चिंचवड स्टेशन, बॅडमिंटन हॉल चिंचवड
५ १७८ ते १८३ चिंचवड लोकमान्य मेडीकल फाऊडेशन होमियोपॅथीक कॉलेज, चिंचवड ग्लोबल इंडियन इंटरऩॅशनल स्कूल, चिंचवड चिंचवड
६ २१४ पिंपरी कँप मनपा प्राथ. शाऴा भाटनगर शिलाबाई साबळे समाजमंदिर भाटनगर पिंपरी कँप
७ २२५ ते २३० पिंपरी कँप आर्य समाज शाळा, पिंपरी जयहिंद प्रायमरी स्कुल, पिंपरी पिंपरी कँप
८ २८० ते २८३ पिंपरी कॅम्प जय हिंद हायस्कूल, पिंपरी मंघनमल उधाराम कॉमर्स कॉलेज, पिंपरी पिंपरी कँप











