न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ एप्रिल २०२४) :- पीसीएमसीज व्हेरॉक वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या वतीने 2024-25 या हंगामासाठी थेरगावमध्ये निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.
निवड चाचणीसाठी (दि. 16) दुपारी 2 ते 6 या कालावधीत मुलींकरिता वयोगट 15 ते 19 वर्षापर्यंत ज्यांचा जन्म 1 सप्टेंबर 2005 ते 31 ऑगस्ट 2012 दरम्यान झाला आहे. (दि. 17) दुपारी 1.30 ते 6 दरम्यान वयोगट 12 वर्षाखालील मुले ज्यांचा जन्म 1सप्टेंबर 2013 ते 31 ऑगस्ट 2016 दरम्यान झाला आहे. (दि.18) दुपारी 1.30 ते 6 दरम्यान वयोगट 14 वर्षाखालील मुले ज्यांचा जन्म 1सप्टेंबर 2011 ते 31 ऑगस्ट 2013 दरम्यान झाला आहे. (दि.19) दुपारी 2 ते 6
वयोगट 16 वर्षाखालील मुले ज्यांचा जन्म 1 सप्टेंबर 2009 ते 31 ऑगस्ट 2011 दरम्यान झाला आहे. (दि. 21) दुपारी 1.30 ते 6 वयोगट 19 वर्षाखालील मुले ज्यांचा जन्म 1 सप्टेंबर 2006 ते 31 ऑगस्ट 2009 दरम्यान झाला आहे. (दि. 21) दुपारी 1.30 ते 6 वयोगट 23 वर्षाखालील मुले ज्यांचा जन्म 1 सप्टेंबर 2001 ते 31 ऑगस्ट 2004 दरम्यान झाला आहे.
इच्छुक खेळाडूंनी सफेद क्रिकेट गणवेश, क्रिकेट साहित्य आणि ओरिजिनल जन्मतारखेचा दाखला आणि आधारकार्डसह उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.