- भुमकर वस्ती, वाकडमधील प्रकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ एप्रिल २०२४) :- पिडीत तरुणी अति नशेत असल्याचा फायदा घेवुन तिला आरोपी मयत तरुणाने त्याच्या फलॅटवर नेले. तिच्यासोबत शारिरीक संबंध प्रस्थापित केले. घडलेली हकीकत पीडित तरुणीने तिच्या मानलेल्या भावाला दिली.
पीडितेच्या मानलेल्या भावाने शर्टात विट लपवुन पीडित तरुणीला सोबत घेऊन बिल्डींगच्या खाली थांबवले. आरोपी मयत तरुणाच्या फ्लॅटमध्ये जाऊन तिथे मयत आरोपीच्या डोक्यावर विट व इतर वस्तु फेकुन, त्याचे डोके भिंतीवर जोरजोरात आदळून त्याचा खून केला आहे. हा प्रकार (दि.०५) रोजी रात्री ००.३० च्या सुमारास भुमकर वस्ती, वाकड येथे हा प्रकार घडला.
हि सविस्तर हकीकत पोलिसांना अ.म.र.न.४२/२०२४ कलम १७४ सी.आर.पी.सी.च्या चौकशीवरुन समजली. आरोपी लोकेंद्र किशोरसिंह (वय २८ वर्ष) याला हिंजवडी पोलिसांनी ताब्यात घेतले असून ४६५/२०२४ भादवि कलम ३०२ अन्वये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोउपनि कांदे पुढील तपास करीत आहेत.