न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ एप्रिल २०२४) :- मावळ लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेकरिता पिंपरी विधानसभा कार्यालयांतर्गत नियुक्त केलेल्या १४२२ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांपैकी ४६७ कर्मचारी अनुपस्थित राहिले. या अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांनी दिली. त्यामुळे गैरहजर राहण्याऱ्या कर्मचा-यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी १४२२ अधिकारी आणि कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणासाठी शासनाकडून विशेष कार्यक्रम राबवण्यात येत आहेत.
या सर्व प्रशिक्षणांना संबंधित अधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहणे अनिवार्य होते. यासंदर्भातील आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याची दक्षता सर्व संबंधित अधिकारी व कर्मचार्यांनी घ्यावी, असे आदेश निवडणूक शाखेमार्फत निर्गमित करण्यात आले आहेत.